प्रयत्न

 

प्रयत्न करीन

 

मी घरी जिवंत परतण्याची शक्यता पावसामुळे २०%, गर्दीमुळे १०%, कामाच्या ताणामुळे कदाचित येऊ शकणाऱ्या हार्ट अटॅकमुळे ३० टक्क्यांनी कमी होते. अशी परिस्थिती, नव्हे वस्तुस्थिती असताना आई म्हणते, "घरी लवकर ये", तेव्हा "प्रयत्न करेन" एवढच उत्तर देता येऊ शकतं.

 

बॉस म्हणतो, "जायच्या आधी, हे एवढं करून दे!"

"प्रयत्न करेन. " ते मी करेनच पण त्या आधी मी बिल्डिंगवरून उडी मारली तर... "हो, करतो. " असं खोटं आश्वासन नाही दिलं.

 

मित्र म्हणतात, "आज रात्री बसू या!"

"प्रयत्न करेन."

"नाही" म्हणून मैत्री तोडायची नाहीये. "हो" म्हणून खोटं बोलायचं नाहीये. इच्छा आहे मनात, ताकद नाही तनात. मनातल्या मनात केला मी प्रयत्न. शेवटी "मैत्री"नं पण प्रयत्न केला जगायचं. मुबंईनं तिचासुद्धा बळी घेतला.

 

पण मग मुंबईशी मी एकदा बोलताना तिला विचारलं की माझ्या स्वप्नांचं काय? राबलो की मी!

ती म्हणाली, "प्रयत्न केला, जमलं नाही."

 

मग मी स्वतःला प्रश्न विचारला, "तू आयुष्यात जे काही मिळवायचा प्रयत्न केला, ते मिळालं का?"

नाही.

 

"जे काही गमावलं, ते वाचवायला काय केलं?"

 

प्रयत्न.

 

शेवटी 'अर्थ' तर नाहीच, आयुष्यालाही अर्थ नाही.

 

मग ते ४०% गेले उडत. बास झालं. जगण्याचाही प्रयत्न केला.    

Comments

Popular posts from this blog

After A Day's Work

Birthdays are funny days