Posts

Showing posts from December, 2023

प्रयत्न

  प्रयत्न करीन   मी घरी जिवंत परतण्याची शक्यता पावसामुळे २०%, गर्दीमुळे १०%, कामाच्या ताणामुळे कदाचित येऊ शकणाऱ्या हार्ट अटॅकमुळे ३० टक्क्यांनी कमी होते. अशी परिस्थिती, नव्हे वस्तुस्थिती असताना आई म्हणते, " घरी लवकर ये ", तेव्हा " प्रयत्न करेन " एवढच उत्तर देता येऊ शकतं.   बॉस म्हणतो, " जायच्या आधी, हे एवढं करून दे !" " प्रयत्न करेन. " ते मी करेनच पण त्या आधी मी बिल्डिंगवरून उडी मारली तर ... " हो, करतो. " असं खोटं आश्वासन नाही दिलं.   मित्र म्हणतात , " आज रात्री बसू या!" "प्रयत्न करेन." "नाही" म्हणून मैत्री तोडायची नाहीये. "हो" म्हणून खोटं बोलायचं नाहीये. इच्छा आहे मनात , ताकद नाही तनात. मनातल्या मनात केला मी प्रयत्न. शेवटी "मैत्री"नं पण प्रयत्न केला जगायचं. मुबंईनं तिचासुद्धा बळी घेतला.   पण मग मुंबईशी मी एकदा बोलताना तिला विचारलं की माझ्या स्वप्नांचं काय ? राबलो की मी! ती म्हणाली , " प्रयत्न केला , जमलं नाही."   मग मी स्वतःला प्रश्न विचारला , " तू आयुष्यात जे काही म